MNS 'Har Har Mahadev' Free Show : ठाणे नवी मुंबईत मनसेकडून 'हर हर महादेव'चा मोफत शो

काल विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला सिनेमाचा शो राष्ट्रवादीनं बंद पाडला... प्रेक्षकांसोबत राडा झाला आणि त्यानंतर मनसेनं विवियाना मॉलमधील जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडलेला सिनेमा पुन्हा सुरु केला.. आज विवियाना मॉलमध्ये मनसेच्या वतीनं हर हर महादेव सिनेमाचा मोफत शो दाखवण्यात आला.. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठा मावळ्यांचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय... आणि हा सिनेमा दाखवला जाऊ नये अशी मागणी केलीए... यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झालीए.. पण या लढाईत आता मनसेनं उडी घेतली असून मनसेनं सिनेमा दाखवला जावा असा पवित्रा घेतलाय.. त्यामुळे आता हर हर महादेव सिनेमावरुन जोरदार राजकीय घमासान सुरु झालाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola