Dombivli MIDC Blast : काचा फुटल्या, स्लॅब कोसळला, लॅबचं नुकसान; स्फोटामळे शाळा हादरली

Continues below advertisement

डोंबिवलीत स्फोटामुळे जवळच असलेल्या जी.आर.पाटील कॉलेज आणि शाळेचं मोठं नुकसान, इमारतीच्या अनेक खिडक्या, लॅब, यासह कार्यालयातील साहित्यांचं मोठं नुकसान, शासनाने नुकसान भरपाई द्यावी, मुख्यध्यापिका आरजू दुसेजा यांनी केली मागणी. 

ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Dombivli MIDC Explosion) पहिली अटक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिकमधील मेहेरधाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे.

डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि  आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram