Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार

Continues below advertisement

राज्यात सध्या हवामानाची विविध रूपं आणि रंग बघायला मिळतायेत. सध्या काही भागात अवकाळी पावसाचा प्रकोप पहायला मिळतोये. काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणारा दुष्काळ. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसानं काहीसे सुखावलेले अकोलेकर सध्या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झालेयेत. गेल्या पाच दिवसांत अकोल्याचं तापमान सातत्यानं 42 ते 44 अंशांदरम्यान फिरंतये. काल अकोल्याचा पारा 44 अंशांवर होताय. आजही अकोल्यात तशीच परिस्थिती आहेय. या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम झालाय तो अकोला शहरातील जनजीवनावर. अकोल्यातील ऊन्हाच्या याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी…. 

Pravara River SDRF Boat : प्रवरा नदीत मोठी दुर्घटना! SDRF ची बोट बुडाली, तिघांचा मृत्यू

उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असतानाचा आता अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटल्याची घटना घडली आहे.  यात तिघांचा मृत्यू झाला आहे. बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या SDRF पथकाची बोट उलटली आहे. यात 5 जण होते. त्यातून तिघांचा मृत्यू झाला आहे. 

हे व्हिडिओ देखील पाहा

उजनी धरणात  (Ujani Dam)बोट उलटून बुडाली. यात सहाजण  बेपत्ता होते अखेर शोधमोहितमेनंतर पाच जणांचे मृतदेह हाती लागली लागले आहेत. मागील 36 तास या सगळ्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान घेत होते. अखेर त्यांना यश आलं असून पाच मृतहेद हाती लागले आहेत आणि एका मृतदेहाचा अजूनही शोध सुरु आहे. यात जाधव पती पत्नी गोकूळ जाधव आणि कोमल जाधव व त्यांची दोन लहान मुले आणि एकाचा मृतदेह हाती लागला आहे. हे मृतदेह बाहेर काढून पोस्ट मार्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. आता एकाचा मृतहेद शोधण्यासाठी पथक कामाला लागलं आहे. त्याचा मृतहेद कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram