Vasai Virar Waterlogging : आगाशी रोड पूर्णपणे पाण्याखाली, नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस
वसई-विरारच्या नालासोपारा शहरात काल दिवसभर पावसाने हाहाकार माजवला होता. आजही सकाळपासून वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.. वसईच्या मधुबन परिसरातही पाणी साचलंय. तर विरार पश्चिमेकडील आगाशी रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. रस्यावर पाणीच पाणी दिसत आहे. राञी विरारच्या अर्नाळा खाडीचा पाडा, कातकरी पाडा येथून ९४ नागरीकांना एनडीआरएफ आणि पालिकेच्या अग्निशमन दलानं रेस्क्यू करुन सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केलंय.