
Thane Road Traffic- मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक; एक जुन पुर्वी रस्त्याची कामं पुर्ण करण्याचे आदेश
Continues below advertisement
शहरातील कामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश रस्ते खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी मुक्त करण्याच्या सूचना निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Continues below advertisement