CM Eknath Shinde on Ayodhya Daura : मुख्यमंत्री शिंदेंचा अयोध्या दौरा, ठाण्यातून ताफा निघाला
CM Eknath Shinde on Ayodhya Daura : मुख्यमंत्री शिंदेंचा अयोध्या दौरा, ठाण्यातून ताफा निघाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अयोध्या दौऱ्यासाठी निघणार आहेत.. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने त्याची मोठी तयारी केलीय.. आज मुख्यमंत्री शिंदे मुंबई विमानतळाकडे रवाना होतील.. तिथून ते लखनऊला जातील... रात्री लखनऊमध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील.. शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजप नेतेही सहभागी होणार आहेत.. भाजप नेते संजय कुटे, राम शिंदे ही अयोध्येला रवाना होत आहे...