Anandh Dighe Jayanti : आनंद दिघे यांची आज जयंती, शिंदे गट ठाण्यात शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता
आनंद दिघे यांची आज जयंती... त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आनंद आश्रम आणि शक्तिस्थळ येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आणि प्रताप सरनाईक असे नेते देखील येणार असल्याची माहितीय. काल उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचा दौरा केला, त्यावेळी त्यांनी आनंद आश्रमात जाणं टाळलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणारेय. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याला ठाकरे गट विरोध करणार का?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
Tags :
Dada Bhuse Thane Uddhav Thackeray Anand Dighe Eknath Shinde Shambhuraj Desai : Uddhav Thackeray