Pune Crime : यवतमधील दौंड हत्या प्रकरणाला मोठं वळण, दफन केलेल्या मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन
Continues below advertisement
पुण्याच्या यवतमधील भीमा नदी हत्या प्रकरणाला आता नवं वळण आलंय. दौंड तालुक्यातील पारगावमध्ये हत्या करण्यात आलेल्या सात पैकी तीन मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन केलं जाणारेय. त्यासाठी अंत्यविधी करुन दफन करण्यात आलेले मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आलेत. ससून रुग्णालयाच्या टीमकडून पुन्हा शवविच्छेदन केलं जाणारेय. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींनाही अटक केलीये.
Continues below advertisement