Thai Boxing | भिवंडीत ओपन फाईट, वातावरण टाईट! प्रेक्षकांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पिराणी पाडा परिसरात असलेल्या यहीया कंपाऊंड येथे भिवंडी फाईट क्लबचे आयोजन करण्यात आले होते. या फाईट ला थाई बॉक्सिंग या नावाने ओळखले जाते यामध्ये दोन फायटर एका रिंग मध्ये प्रवेश करून फाईट करतात. या फाईटला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. देशात कोरोना काळ सुरु असताना देखील याठिकाणी कोरोनाच्या कोणत्याही नियमांच पालन कोणीही करतांना दिसल नाही , याठिकाणी कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता , सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. याप्रसंगी फाईट क्लबचे आयोजक सलमान अब्दुल कयुम याच्या विरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.