Hindi Virodhi Andolan | हिंदी शिक्षण विरोधात दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलैला मुंबईत एकत्र उतरणार
इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलैला मुंबईत एकत्र रस्त्यावर उतरणार. आज मराठी अभ्यास केंद्र व समविचारी संस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदी संदर्भातील GRची प्रतीकात्मक होळी केली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मराठी पत्रकार संघाबाहेर GR व प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करण्यात आली. "५ जुलैला महाभव्य मोर्चा काढण्याचा निर्धार" असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आंदोलनामुळे रस्ता रोको व वाहतूक कोंडी झाली.