PM Narendra Modi यांच्या Jammu दौऱ्याआधी दहशतवादी हल्ल्याच्या कट उधळला, मोठा शस्त्रसाठा जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी दहशतवाद्यांनी सीआयएसएफच्या कॅम्पजवळ जवानांच्या बसवर हल्ला केला. पहाटे सव्वा चारच्या सुमारास सीआयएसएफच्या १५ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात सीआयएसएफचा एक जवान शहीद झाला, तर सहा जवान जखमी झाले. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एका घरात दहशतवादी लपले असून त्यांना सुरक्षा दलांनी घेरलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी जाणार आहेत तिथून जवळच दहशतवाद्यांनी हा हल्ला केलाय.