आजपासून लालपरी सुसाट ! ST चे 76 हजार कर्मचारी कामावर परतले उर्वरित कर्मचारी उद्या हजर होणार

जवळपास सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर आजपासून लालपरी पुन्हा एकदा सुसाट धावरणार आहे. न्यायालयनं संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी 22 एप्रिलचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर एकूण ८१ हजार ६८३ पैकी ७७ हजार 962 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. उर्वरित 4  हजार 721 कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय आणि इतर चाचण्या बाकी आहेत. त्याची पूर्तता होताच हे कर्मचारीही कामावर हजर होणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होईल. कोरोना काळापूर्वी एसटीमधून दररोज 65 लाख प्रवाशांची वाहतूक होत होती. मात्र संपामुळे एसटीचं चाक थांबलं होतं. सध्या दररोज 25 हजार फेऱ्या सुरू असून 17 लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola