Telangana Political Crisis : Maharashtra , Delhi नंतर आता तेलगंणामध्ये खोक्यांवरुन वातावरण तापलं
Continues below advertisement
महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर आता तेलंगणाच्या राजकारणात आमदार खरेदीसाठी खोक्यांचा आरोप सुरु झालाय. तेलंगणात पोलिसांनी छापा टाकून आमदार खरेदीचा प्रकार समोर आणलाय. पोलिसांनी छाप्यात १५ कोटी रुपये जप्त करण्यात आलेत आणि सत्ताधारी टीआरएसच्या चार आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होतोय. त्यांना फार्महाऊसवर बोलावण्यात आलं होतं. त्यां च्या तक्रारीनंतर अजीज नगरच्या फार्म हाऊसमध्ये पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईनंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची टीआरएस आणि विरोधी पक्ष भाजप आमनेसामने आलेत. भाजपने आमदार खरेदीचा बाजार मांडल्याचा आरोप टीआरएसनं केलाय. तर भाजपनं हा टीआरएसचं हे राजकीय नाटक असल्याचं प्रत्युत्तर दिलंय.
Continues below advertisement