Teera Kamat | पालकांच्या संघर्षानंतर अखेर सहा महिन्याच्या तीराला ते औषध मिळालं! | एबीपी माझा
मुंबई : सहा महिन्याच्या तीराला जीन रिप्लेसमेंट उपचारांची गरज असून 'झोलजेन्स्मा’ हे औषध हवे होते, ते अमेरिकेतून आले आणि आज डॉक्टरांनी ते औषध तीराला दिले. त्याकरिता तिला माहीमच्या पी. डी हिंदुजा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे औषध दिल्यानंतर शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. गेली काही महिने तीराच्या पालकांनी हे औषध तीराला मिळावे यासाठी मोठा संघर्ष केला. आज अखेर तिला हे औषध देण्यात आले असून तिची तब्येत लवकर ठिक व्हावी म्हणून तीरासाठी अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या, त्या सर्वासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.