Facebook Stock : काही तासातच Mark Zuckerberg गमावले 45,555 कोटी रुपये, श्रीमंतांच्या यादीतील स्थानही घसरलं
Continues below advertisement
Facebook Stock : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) अवघ्या काही तासातच सहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 45 हजार 555 कोटी रुपये गमावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती गमावल्याने त्याच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थानामध्येही घसरण झाली असून तो आता बिल गेट्स यांच्यानंतर पाचव्या स्थानी पोहोचला आहे. काल फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्रामचे (Instagram) जगभरातील सर्व्हर तब्बल सहा तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका थेट फेसबुकला बसला असून फेसबुकचे शेअर्सही 4.9 टक्क्यांनी घसरले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement