Elon Musk Recommends Signal App सिग्नल अॅप Whatsapp पेक्षा सुरक्षित? इलॉन मस्क यांच्या ट्वीटची कमाल!
व्हॉट्सअॅपची नवीन प्रायव्हरी पॉलिसी समोर आल्यापासून सर्वजण व्हॉट्सअॅपला पर्याय शोधू लागलेत, कारण या पॉलिसीनुसार तुमच्या चॅट्समधील सर्व माहिती व्हॉट्सअॅपला मिळणार आहे, काही जणं टेलिग्रामला पसंती देतायत तर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी पर्याय म्हणून सिग्नल नावाचं अॅप वापरण्याबद्दल ट्वीट केलंय. इलॉन मस्क यांच्या या ट्वीटनंतर सिग्नल अॅप इन्स्टॉल करण्यासाठी लोकांनी धाव घेतली, इतक्या युजर्सना हाताळण्यासाठी हे अॅपही तयार नव्हतं, त्यामुळे नव्या युजर्सना अकाऊंट तयार करण्यासाठी वेरिफिकेश कोड मिळत नव्हते. मात्र या अॅपच्या वतीने ट्वीट करत युजर्सना ही अडचण लवकरच सोडवणार असल्याचं सांगितलं.
Tags :
What Is Policy Whatsapp New Policy Messenger Apps Signal Application Signalapp Signal App Whatsapp News Telegram Tech News WhatsApp New Privacy Policy Whatsapp Technology Trending News