कोरोना अजून 3-4 वर्ष राहणार लस संशोधन क्षेत्रातले 'भीष्माचार्य', डॉ.सुरेश जाधव यांचं महत्वपूर्ण वक्तव्य
गेल्या काही महिन्यांपासून ज्या कोरोना लसीची जनतेला प्रतीक्षा होती, ती संपली आहे. कारण आता येत्या 16 जानेवारी पासून कोरोना लसीकरणाला देशभरात सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 3 कोटी नागरिकांचं लसीकरण होणार आहे. यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सर्वात आधी कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यानंतर देशातील 50 वर्षांहून अधिक वयाच्या आणि गंभार आजारानेग्रस्त असलेल्या नागरिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. कोरोना लसीकरणाची नोंदणी केली जाणार आहे.