AUDI Q7 आता भारतात लॉन्च, अवघ्या 6 सेकंदांमध्ये 0-100 किमी/तास गती प्राप्त करण्याची क्षमता

अलिशान अशी ओळख असलेल्या कार उत्पादक कंपनी ऑडीने आज भारतात ऑडी क्यू-7 लाँचची घोषणा केली. परफॉर्मन्स, स्टाईल आणि ड्रायव्हिंगसाठी उत्तम अशा सोयीसुविधांनी ही डिझाइन करण्यात आली आहे. शिवाय कंपनीचा दावा आहे की अवघ्या 6 सेकंदांमध्ये 0-100 किमी/तास गती प्राप्त करते.. या कारमध्ये अधिक एैसपैस जागा आणि अनेक फीचर्स आहेत. शिवाय या गाडीचे दोन व्हेरीयंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ऑडी क्यू-7 प्रिमिअम प्लस आणि ऑडी क्यू 7 टेक्नोलॉजी अशी व्हेरिएण्ट असून या गाडीची किंमत व्हिरेएंटनुसार अनुक्रमे 79 लाख 99 हजार आणि 88 लाख 33 हजार इतकी भारतीय बाजारपेठेत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola