5G service in India : 12 ऑक्टोबरपासून 13 शहरांत 5जी सेवा सुरु होणार ABP Majha

मोबाईल फोन आणि इंटरनेट यूजरसाठी महत्त्वाची बातमी.... आता तो दिवस दूर नाही की एखादा सिनेमा तुमच्या डोळ्याची पापणी लवण्यापूर्वी डाऊनलोड होईल... कारण येत्या १२ ऑक्टोबरपासून देशात फाईव्ह-जी सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडियन मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन होणार आहे. याच परिषदेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते फाईव्ह जी सेवा लाँच केली जाण्याची शक्यता आहे. १२ ऑक्टोबरपासून देशातल्या १३ प्रमुख शहरांत ही सेवा सुरु होईल असा अंदाज आहे. या सेवेसाठी तयार राहण्याचे आदेश दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टेलिकॉम कंपन्यांना दिलेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola