24 तास वीजेसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची तेलगंणामध्ये शेती खरेदी,ते T. Harish Rao यांचा दावा
Continues below advertisement
महाराष्ट्रात सध्या मोठी वीजटंचाई निर्माण झालेली आहे.. एकीकडे महागड्या वीजेमुळे राज्याबाहेर जाणाऱ्या उद्योजकांच्या पावलावर शेतकऱ्यांनीही पाऊल ठेवलंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय... कारण तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी एक मोठा दावा केलाय. महाराष्ट्रातल्या वीज टंचाईला कंटाळून तिथले शेतकरी तेलंगणात शेती खरेदी करत असल्याचं टी हरीश राव यांनी म्हटलं. 24 तास वीजेसाठी शेतकरी तेलंगणात येत असल्यचं राव म्हणाले आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सध्या मोठ्या वीजकपातीला सामोरं जावं लागतंय. रात्रीची 8 तास वीज मिळत असल्यानं शेतीला पाणी देण्यासाठीही रात्र-रात्र जागावं लागतंय... या त्रासामुळे शेतकऱ्यांनी असे निर्णय घेतल्याचं टी हरीश राव यांनी सांगितलंय.
Continues below advertisement