Mumbai : Devendra Fadnavis यांच्या 22 आरोपांना मुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देणार? : ABP Majha
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. काल अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यानंतर बोलताना आजी- माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली. भाजपने विधिमंडळातून मुंबई पालिकेला टार्गेट केलं. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुंबई पालिकेवर घोटाळ्याचे 22 आरोप केलेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त केलं होतं. पण आज मात्र मुख्यमंत्री भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार, केंद्रीय यंत्रणांची कारवाई, श्रीधर पाटणकर प्रकरणावर मुख्यमंत्री काही बोलणार का हे पाहावं लागणार आहे