Swami Samarth Marathi Serial:स्वामी समर्थ मालिकेतल्या एका दृश्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
कलर्स वाहिनीवरच्या स्वामी समर्थ या मालिकेतल्या एका दृश्यावर संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतलाय.. मालिकेत छत्रपतींच्या वंशजांच्या श्रीमुखात भडकावल्याच्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आलाय.. हे दृश्य मालिकेतून काढण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केलीय..कलर्स वाहिनीनं माफी मागावी अशीही मागणी करण्यात आलीय..