Maharashtra School Reopen:सोमवारपासून पहिली ते बारावीच्या शाळांबरोबरच शिशुवर्गही सुरू होणार
सोमवारपासून पहिली ते बारावीच्या शाळांबरोबरच, पूर्व प्राथमिक अर्थात शिशु वर्गही सुरु होणार आहे. ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळं बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय. शाळा सुरु करण्यासाठी एबीपी माझाच्या मोहिमेला मिळालेलं हे मोठं यश आहे. दरम्यान शाळा सुरु करण्यासंदर्भातले सर्व अधिकार हे स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसंच पालकांच्या संमतीनंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार आहे.