Siddharth Pithani Statement | सुशांतसिंहला भूत-प्रेताची भीती वाटत होती,मित्र सिद्धार्थ पिठानीचा जबाब
सुशांतच्या केप्री हाइट्स घरात भूत-प्रेत असल्याचा भास सुशांतला होत होता. सुशांतला ते घर सोडायचं होतं, असा जबाब सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने दिला. सुशांतला नेहमी वाटायचं की त्या घराच्या गेस्ट हाउस मध्ये कोणीतरी राहतं. जेव्हा रिया आणि तिचा भाऊ शोविक तेथे राहायला आले तेव्हा त्यांनाही तसाच भास झाला. याच कारणाने सुशांत केप्रि हाईट्स मधील घर सोडण्याचा विचार करू लागला. सुशांतच्या घरी सॅम्युअल हॉकिस पण राहत होता, तो सुशांतच्या घरची कामं करायचा, एकदा सुशांतने त्याला घर खर्चाचा हिशोब विचारला जे तो देऊ शकला नाही. त्याच्यावर सुशांत त्याच्यावर ओरडला.