कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केल्याने सुरेश धस यांच्यावर गुन्हा,आमदार धस चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
बीडच्या आष्टीमधील भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यापूर्वीही परजिल्ह्यात जाऊन ऊसतोड कामगारांना घेऊन आल्यानं धस यांच्यावर एक गुन्हा नोंद आहे.