Devendra Fadnavis Pc | शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र लिहावं : देवेंद्र फडणवीस

केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही पॅकेज जाहीर केलं पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच कोरोना व्हायरसमुळे उभं राहिलेल्या संकटचा मुकाबला सरकार पाहिजे तसा करत नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना भेटीची माहिती देताना सरकारवर टीकाही केली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, मनोज कोटक यांचा समावेश होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola