छत्रपती आमचेच आहेत, तुमचे नाहीत असं म्हणणं चुकीचं - सुधीर मुनगंटीवार

बेळगाव: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे, असं वक्तव्य केलं आहे. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात संमिश्र सरकार आहे. काँग्रेस केव्हा आपल्याला खुर्चीवरून उतरवेल याची भीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्या कारणासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत, असं देखील कार्जोळ म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola