रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे हिला हात मिळाले, 15 तासांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार!
Continues below advertisement
साडेसहा वर्षांपूर्वी मोनिका मोरे या तरुणीने एका रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावले होते, मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि तिला आपले हात तब्बल साडेसहा वर्षांनंतर परत मिळाले आहेत. मोनिकाला मदत मिळणार यासाठी किरीट सोमय्या प्रयत्नात होते, त्यांनी तिला हात परत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आज ते सत्यात उतरलं.
Continues below advertisement