Mumbai Rains Update | मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची दमदार हजेरी, सकाळपासून पावसानं झोडपलं
मुंबईत आज सकाळपासूनच दमदार पाऊस बरसत आहे, नवी मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांनाही पावसानं झोडपलंय. इतरही अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या पावसामुळे पाणी साचलं. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला, त्यामुळे भिवंडी शहरातील सखल भागात पाणी साचलं, भिवंडीत पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कामवाडी नदीची पाणी पातळी वाढू शकतो आणि शहराला धोका निर्माण होऊ शकतो.