Auto-Riksha Stunt | मुंबईत टवाळखोर तरुणांची स्टंटबाजी,धावत्या रिक्षात लटकून महिलांशी गैरवर्तन
मुंबईत काही टवाळखोर तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हीडिओ व्हायरल झालाय. एका रिक्षातून आठ-दहा मित्रांनी स्टंटबाजी केली आणि महिलांशी गैरवर्तन केलं असा आरोप आहे. धावत्या रिक्षात तरुण लटकत असताना आणि आक्षेपार्ह हातवारे करताना व्हीडिओमध्ये दिसतायत. मुंबईत एकता नगर ते कांदिवली चारकोप दरम्यान हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय.