Ram Kadam on Railway | खासगी गाड्यांना फायदा करून देण्यासाठी रेल्वे उशिरा सोडल्या, राम कदमांचा सरकारवर निशाणा

Continues below advertisement

मुंबईत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची लाखोंच्या घरात संख्या आहे. कोकणी बांधव वर्षभरात गणेशोत्सवात हमखास आपल्या घरी कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. परंतु यंदा कोरोना व्हायरसचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासनाने मोठय़ा प्रमाणात या सणावर निर्बंध लादले आहेत. यामध्ये कोकणात गेल्यानंतर काही दिवसांचे क्वॉरंटाईन, कोरोना चाचणी बंधनकारक असे नियम होते. यामुळे कोकणात जाणाऱ्यांची काही दिवसांपूर्वी झुंबड उडाली होती. याचाच़ फायदा उठवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. ज्यावेळी कोकणात जाणाऱ्यांना एसटी सेवा, रेल्वे सेवाची गरज होती त्यावेळी राज्यसरकारने जाणूनबुजून रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली नाही, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram