Chetan Chauhan Passes away | माजी कसोटीवीर आणि मंत्री चेतन चौहान यांचं कोरोनामुळे निधन

Continues below advertisement

चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हे उत्तर प्रदेश मंत्रीमंडळातले दुसरे मंत्री आहेत ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,  या आधी तीन ऑगस्ट ला कॅबिनेट मंत्री कमल राणी यांचाही मृत्यू झाला होता. चेतन चौहान यांची राजकीय कारकीर्द उत्तर प्रदेशात बहरली. पण त्यांचे क्रिकेट महाराष्ट्राने घडवले. महाराष्ट्राकडून ते रणजी खेळले, छान मराठी बोलत आणि प्रत्येक भेटीमध्ये पुण्याच्या आठवणी काढत. सुनील गावस्कर आणि चेतन चौहान भारताचे भरवशाचे आघाडीचे खेळाडू होते. चेतन चौहान यांनी गावस्करना सतत मोलाची साथ दिली. पण एका बाबतीत ते अभागी ठरले. नव्वदीच्या घरात गेले की नर्व्हस होऊन आऊट होत. परिणामी कसोटीमध्ये नावावर भरपूर धावा असल्या तरी त्यात शतक एकही नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram