SSC HSC Exam | दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घेण्याचा विचार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
कोल्हापूर : दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होतात. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. या सर्वांना दिलासा देत 10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोल्हापुरात दिली आहे.