#Tablighi तबलिघी जमातसाठी गेलेल्यांमुळे कोरोनाचा फैलाव हा मीडियाचा प्रपोगंडा -औरंगाबाद खंडपीठ
Continues below advertisement
औरंगाबाद : दिल्लीतील तबलिघी जमातसाठी गेलेल्यांनीच देशात कोरोनाचा फैलाव केला, असा अकारण प्रपोगंडा मीडियाने केल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ओढले असून महाराष्ट्र पोलिसांनी परदेशी तबलिघींविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द केला आहे. तबलिघींविरूद्ध केलेल्या कारवाईत द्वेषाचा वास येतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
दिल्लीतील मकरझला आलेल्या परदेशी तबलिघींविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने मोठा प्रपोगंडा केला आणि हे परदेशी तबलिघीच भारतात कोरोना पसरण्यास कारणीभूत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या परदेशी तबलिघींचा अक्षरशः छळवाद मांडण्यात आला, असेही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम.जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.