Pune Dagdusheth Halwai Ganpati | पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती, घरबसल्या घ्या दर्शन!

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे यावर्षी आहे आपले सर्व कार्यक्रम रद्द करत अतिशय साधेपणाने गणेश उत्सव साजरा करणार आहे. सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरे होणार आहेत. साजरा होणारा आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे अथर्वशीर्ष. अथर्वशीर्ष यांना जाहीर कार्यक्रम होणार असला तरी त्याची परंपरा मात्र खंडित होणार नाही. कारण काही निवडक महिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात बसून अथर्वशीर्ष म्हणणार आहेत आणि त्याचं लाइव्ह प्रक्षेपण ही होणार आहे. या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी दगडूशेठ गणपती मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी असं आवाहन ही दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून करण्यात आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola