Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान

Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान 

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आज 22 वा दिवस आहे. पीएम मोदी यांनी आज (21 मार्च) इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली. पंतप्रधानांनी लिहिले की, "मी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पाझाश्कियान यांच्याशी बोललो. या सणासुदीच्या काळात मध्य-पूर्वेत शांतता आणि स्थैर्य नांदेल, अशी आशा आम्ही व्यक्त केली."

पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध 

इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणात, मोदींनी मध्य-पूर्वेतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील (जसे की तेल, वीज इत्यादी) हल्ल्यांचा निषेध केला, कारण त्याचा परिणाम त्या प्रदेशातील शांततेवर आणि जागतिक पुरवठ्यावर होतो. ते म्हणाले की, सुरळीत व्यापारासाठी सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या संरक्षणासाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी इराणचे आभारही मानले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola