Sonu VS BMC | मुंबई मनपाबरोबरच्या वादात सोनी सूदची माघार,हॉटेलला पुन्हा रहिवासी दर्जा देण्याची तयारी

Continues below advertisement
 मुंबई :  मुंबईच्या जुहूमधील आपल्या फ्लॅटमध्ये झालेल्या अवैध बांधकामप्रकरणी बीएमसीच्या नोटिसीविरोधात सुप्रीम कोर्टात गेलेल्या अभिनेता सोनू सूदनं आपली याचिका परत घेतली आहे. त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की, सोनूने बीएमसीसमोर आपला पक्ष सविस्तर ठेवला आहे. तो आता BMC च्या निर्णयाची वाट पाहात आहे.  सोनू सूदची मुंबई महापालिकेविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पालिकेनं सोनू सूदविरोधात जी कारवाई केली आहे, ती योग्यच आहे, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर तो सुप्रीम कोर्टात गेला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram