Kartiki Mahapuja : कार्तिकी महापूजेसंदर्भातील मराठा समाजातील वाद मिटले, प्रशासनाच्या बैठकीत तोडगा

Continues below advertisement

पंढरपूरमधील विठ्ठलाची शासकीय महापूजा कोणी करायची याविषयीचे वाद आज मिटण्याची शक्यता आहे. काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या एकत्रित बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मराठा समाजातील सर्व गट एकत्र आल्यामुळे तोडगा दृष्टीपथात आला आहे. मराठा समाजानंतर आज कोळी समाजाची बैठक आहे. त्यात कोळी समाजाचा विरोध मावळण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसंच दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकीच्या शासकीय पूजेचा मान मिळेल असंही सांगितलं जातंय. पंढरपूरच्या शासकीय महापूजेनंतर ते त्याचं कुलदैवत असलेल्या निरा नरसिंहपूर येथे जाण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram