Pandharpur Fortuner Car : फॉर्च्युनर कार 50 फूट कालव्यात, ज्येष्ठ कलावंत मीना देशमुख यांचा मृत्यू

Continues below advertisement

मोडलिंब कडून पंढरपूरकडे येताना काल रात्री एक फॉर्च्युनर कार ५० फूट खोल कालव्यात कोसळल्याने मीना देशमुख या जेष्ठ लावणी कलावंतिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात त्यांची कन्या , नातं आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत . या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी रात्री तातडीने रुग्णवाहिका बोलावली मात्र या खोल कालव्यात उतरायला जागा नसल्याने दोराच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते . दरम्यान या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले . रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार या खोल कालव्यात पडल्याचे सांगितले जात आहे . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram