Sanjay Raut : बेळगाव कोर्टात बोलावून अटक करण्याचा कट, याची महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी
बेळगावमध्ये ३० मार्च २०१८ रोजी केलेल्या प्रक्षोभक भाषणाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स पाठवण्यात आले आहे. बेळगाव न्यायालयाने त्यांना हे समन्स पाठवले आहे. यामध्ये संजय राऊत यांना १ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरुन आता महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक हा वाद तापण्याची शक्यता आहे.