Tuljapur Temple : तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा सुळसुळाट, पिंजरा लावून उंदिर पकडण्यास सुरुवात
आणि आता बातमी तुळजाभवानी मंदिरातील उंदरांची, धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरात उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. भाविकांकडून पेढे, साखर, लाडूसह अन्य गोड पदार्थ अर्पण करण्यात येत असल्याने मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात उंदारांचा वावर पाहायला मिळतोय. दरम्यान देवीच्या मंदीरात उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तुळजाभवानी मंदिरात २४ तास नंदादीप तेवत असतो, तसेच सीसीटीव्हीसह दिवे सुरु असतात. त्यामुळे वायर कुरतडण्याने शॉट सर्किट घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी भक्तांनी केलीय. तर उंदिर पकडण्यासाठी टीम दाखल झालीय.