Pandharpur Accident : पंढरपूर - मोहोळ मार्गावर तरुणांच्या कारला बसची धडक, तिघांचा जागीच मृत्यू

मोहोळ पंढरपूर मार्गावर पेनुर जवळ कार आणि खाजगी बस च्या भीषण अपघातामध्ये पंढरपुरातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झालाय. शहरातील विजापूर गल्लीमध्ये राहणारे हे तीन युवक मोहोळ वरून पंढरपूरकडे येत होते. समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या खाजगी बसने युवकांच्या कारला धडक दिली. यामध्ये ऋषिकेश साखरे, सुरज कदम,प्रशांत (सर्व राहणार विजापूर गल्ली, पंढरपूर) या तीन युवकांचा जागीच मृत्यू झालाय. शुक्रवारी रात्री अकराच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. या तरुणांच्या मृत्यूने पंढरपूर शहरावर शोककळा पसरली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola