Sukesh Chandrashekar : केजरीवाल - सत्येंद्र जैन यांना पॉलिग्राफ चाचणी करा, सुकेश चंद्रशेखरचं आव्हान
मनीलाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक लेटरबॉम्ब समोर आलाय.. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आप नेते सत्येंद्र जैन यांना पॉलिग्राफ चाचणी करुन घेण्याचं चॅलेंज सुकेश चंद्रशेखरने दिलंय.. पॉलिग्राफ चाचणीसाठी आपण तयार असून केजरीवाल यांनीही हिंमत दाखवावी असं खुलं आव्हान सुकेशनं दिलंय.. दिल्लीच्या सरकारी शाळांच्या प्रमोशनसाठी आंतरराष्ट्रीय पीआरची व्यवस्था करण्यास का सांगितले असा सवाल सुकेशनं विचारलाय.. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूजसाठी 8 लाख 50 हजार डॉलर्स आणि 15 टक्के अतिरिक्त कमिशन देण्यात आल्याचा दावाही सुकेशने केलाय..