Solapur Bus Fire : सोलापुरातील माढ्यात विवाहासाठी आलेल्या खाजगी बस जळून खाक, जीवित हानी नाही
abp majha web team
Updated at:
24 Feb 2023 12:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाढा तालुक्यातील मोडलिम्ब येथे विवाहासाठी आलेल्या खाजगी बसने अचानक पेट घेतल्याने विवाह मंडपात अग्नितांडव सुरू झाले . मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी झाली नसली तरी बस जळून गेली आहे . काल रात्री पुणे येथून नवरदेवाच् वऱ्हाड या खाजगी बस मधून आले होते . वऱ्हाडी कार्यालयात उतरले आणि थोड्याच वेळात बसने अचानक पेट घेतला .. तातडीने गाडीत बसलेल्या चालकाला खाली उतरवून नागरिक आणि वऱ्हाडी मंडळींनी बस विजविण्याचा प्रयत्न सुरू केला . दरम्यान शेजारी असणारी सर्व वाहनेही तातडीने हळविल्याने मोठी दुर्घटना टळली . रात्री उशिरा बस विजविण्याचा यश आले असले तरी योपर्यंत ही बस जळून खाक झाली होती .