Solapur चा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार! उजनीचं पाणी संध्याकाळपर्यंत पंढरपूर बंधाऱ्यात पोहचणार
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सोलापूर या शहरांची तहान भागवण्यासाठी मंगळवारी उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. मात्र धरणातून सोडलेलं पाणी अद्यापही पंढरपूरच्या बंधाऱ्यात पोहोचलं नाही. उजनी धरण ते पंढरपूर बंधारा हे अंतर ११५ किलोमीटर असल्याने पाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी पाणी पंढरपूर बंधाऱ्यात पोहोचेल.
Solapur Ujani Water