Solapur Siddheshwar Sugar Factory : सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी 45 दिवसांची मुदत
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आलीय. 45 दिवसात स्वतः हून चिमणी पाडून घ्या अन्यथा महापालिकेतर्फे चिमणी पाडण्यात येईल. अशी नोटीस सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सिद्धेश्वर कारखान्याला बजावलीये..सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनची चिमणी विमानसेवेला अडथळा ठरत असल्याचा डीजीसीएने दिलेला होता. तर ही चिमणी अनधिकृत असल्याची तक्रार देखील करण्यात आलेली होती. त्यामुळं या चिमणीवर कारवाई करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे.