Solapur Pension Yojana : सरकारी कर्मचाऱ्यांकडून नव्या पेन्शन योजनेला विरोध

शासकीय कर्मचाऱ्यांकडून नव्या पेन्शन योजनेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय. ((नव्या पेन्शन योजनेविरोधात मेसेजही व्हायरल होतोय. तर जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी ठिकठिकाणी आंदोलन करतायत.)) २००४ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस म्हणजे नवी राष्ट्रीय निवृत्तीवेतन पद्धती लागू करण्यात आलीय. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. पण शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सध्या एनपीएसचा परतावा ९.३५ टक्क्यांनी निगेटिव्ह आहे. त्याचा फटका लाखो कर्मचाऱ्यांना बसत असल्याचा दावा करण्यात येतोय. दीर्घकाळात ही पेन्शन योजना चांगली असल्याचा दावा गुंतवणूक सल्लागार करतायत. पण सध्या या योजनेच्या परताव्यात निगेटिव्ह परिणाम दिसत असल्यानं जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola