Solapur Papaya Farm :सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून पपईची लागवड, शेतकऱ्यांनी मिळवलं 22 लाखांचं उत्पन्न

Continues below advertisement

दोन एकरात २२ लाख कमावत यशाचा मंत्र देणाऱ्या शेतकऱ्यांची... सोलापूरचा दुष्काळी पट्ट्यातील कण्हेर या गावच्या अल्पभूधारक शेतकरी बंधूंनी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून हे उत्पन्न कमावलंय.  राज्यात सध्या पपई पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव आहे.. मात्र असं असतानाही कण्हेर गावच्या बाळासाहेब आणि रामदास सरगर या शेतकरी बंधूंनी अवघ्या पावणे दोन एकर शेतीतून २२ लाख रुपयांचं उत्पन्न काढलंय.  ८ महिन्यांपूर्वी त्यांनी २१०० पपईची झाडं लावली होती. आणि संपूर्णपणे शेणखतावर त्यांनी ही शेती पिकवली आहे. पपईला प्रतिकिलो २५ रुपयांचा दर मिळाला असून या पपईला कलकत्ता, चेन्नई या भागातून मोठी मागणीही आलेय

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram