Solapur News : सोलापुरात महिलेची सलून चालकाला चपलेने मारहाण, कारण....
सोलापूर : तुम्ही माझ्या केसांना व्यवस्थित कलर केले नाही, माझे केस काळे होण्याऐवजी पांढरेच दिसत आहेत,असा आरोप करत एका महिलेनं सलून चालकाला चक्क चपलेने मारहाण केल्याची सोलापुरात (Solapur News) घटना घडली आहे. सोलापुरातल्या सात रस्ता परिसरात डायमंड हेअर सलुन आणि ब्युटी पार्लर आहे. मोहम्मद साजिद सलमाने (22) यांनी बाजार पोलीस ठाणे तक्रार दिली आहे. सदर बाजार पोलिसांनी भा.द.वि. 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.वर्षा काळे (आयकर भवन सोसायटी,सोलापूर) असे त्या महिलेचे नाव आहे.