Solapur : सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का, दिलीप कोल्हे यांचा शिंदे गटात प्रवेश करणार
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दिलीप कोल्हे गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रवेश करणार असल्याचं दिलीप कोल्हे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.